प्रयोग व त्याचे प्रकार

/ मराठी व्याकरण

प्रयोग –

मराठीत वाक्यामध्ये महत्वाचे तीन घटक असतात-  कर्ता , कर्म आणि क्रियापद. वाक्यामध्ये क्रिया करणारा कर्ता असतो तर ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असते. कर्ता व कर्म यांचा वाक्यातील क्रियापदाशी संबंध असतो आणि हा संबंध कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग, वचन, पुरूष ह्या संदर्भात असतो. क्रियापदाचे कार्त्याशी किंवा कर्माशी येणारा संबंध म्हणजेच प्रयोग होय.

मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.

१) कर्तरी प्रयोग

२) कर्मणी प्रयोग

३) भावे प्रयोग

१) कर्तरी प्रयोग-

जेव्हा कोणत्याही वाक्यात कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्या वाक्यामधील प्रयोग हा  कर्तरी प्रयोग असतो.

उदा .

महेश पुस्तक वाचतो. (कर्ता- पुल्लिंगी)

राधा पुस्तक वाचते.(कर्ता- स्त्रीलिंगी )

मुले पुस्तक वाचतात. (कर्ता- वचन)

कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये-

१) कर्ता प्रथम विभक्तीत असतो.

२) कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीया विभक्तीत असते.

३) वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते.

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.

अ) सकर्मक कर्तरी प्रयोग

ब) अकर्मक कर्तरी प्रयोग

अ) सकर्मक कर्तरी प्रयोग

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

महेश आंबा खातो.

राधा आंबा खाते. (लिंग)

मुले आंबा खातात. (वचन)

ब) अकर्मक कर्तरी प्रयोग

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

राम हसतो.

राधा हसते. (लिंग)

मुले हसतात. (वचन)

२) कर्मणी प्रयोग

जेव्हा कोणत्याही वाक्यात कर्माच्या लिंग व वचन यानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्या वाक्यामधील प्रयोग हा  कर्मणी प्रयोग असतो.

उदा .

रामने आंबा खाल्ला. (कर्म- पुल्लिंगी)

रामने चिंच खाल्ली. (कर्म- लिंग)

रामने चिंचा खाल्या. (कर्म- वचन)

कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये-

१) कर्ता सामन्यतः तृतीया विभक्तीत असतो.

२) कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते.

३) वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग, वचन यानुसार बदलते.

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

अ) प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग

ब) नवीन कर्मणी प्रयोग

क) समापन कर्मणी प्रयोग

ड)  शक्य कर्मणी प्रयोग

ई ) प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग

अ) प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग

हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात. सकर्मक धातूला ‘ज’ हा प्रत्यय असतो.

उदा.

नळे इंद्रास असे बोलिजेले .

जो – जो किजो परमार्थ लाहो.

ब) नवीन कर्मणी प्रयोग

हा प्रयोग इंग्रजी भाषेमधून मराठीत आला आहे. ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात, तसेच क्रियापद शक्यतो भूतकाळी किंवा विद्यर्थी असते.

उदा .

शेळी वाघाकडून मारली गेली.

चोर पोलिसांकडून पकडला गेला.

क) समापन कर्मणी प्रयोग

जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात. या वाक्यांमध्ये कर्त्याला षष्ठीचा प्रत्यय असतो तर कर्माला प्रत्यय नसतो.

उदा .

महेशचा निबंध लिहून झाला.

आजीची गोष्ट सांगून झाली.

ड)  शक्य कर्मणी प्रयोग

जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. अशा वाक्यांमध्ये कर्त्यास तृतीया / चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय असतो तसेच कर्म प्रथमेत असते.

उदा .

राधाला काम करविते.

त्याच्याच्याने एवढे पदार्थ खवले जाणार नाहीत.

ई ) प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग

कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

महेशने काम केले.

राधाने पत्र लिहिले.

३) भावे प्रयोग

जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचन याप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी , नंपुसकलिंगी , एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा  त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा .

रामाने गवत कापले.

राधाने गवत कापले.

आम्ही गवत कापले.

भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये-

१) कर्ता सामन्यतः तृतीया विभक्तीत असतो.

२) कर्म असल्यास द्वितीया विभक्तीत असते.

३) वाक्यातील क्रियापद नेहमी तृतीयपुरुषी , नंपुसकलिंगी , एकवचनी असते व कर्ता किंवा कर्माच्या लिंग, वचनानुसार ते बदलत नाही.

भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात.

अ) सकर्मक भावे प्रयोग

ब) अकर्मक भावे प्रयोग

क) अकर्तृक भावे प्रयोग

अ) सकर्मक भावे प्रयोग

ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.

उदा.

रामाने रावणास मारले.

ब) अकर्मक भावे प्रयोग

ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात

उदा .

शिक्षकांनी शिकवावे.

विद्यार्थांनी शिकावे.

क) अकर्तृक भावे प्रयोग

भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तृक भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा .

आता उजाडले.

आज सारखे गडगडते.

Share this Post