“ माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। - संत ज्ञानेश्वर

(माझा मराठीचा बोल (शब्द) मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैज लावली, तरी माझा मराठीचा बोल ती पैज जिंकेल कारण अमृतापेक्षा माझ्या मराठी भाषेत गोडवा व माधुर्य अधिक आहे.)

आजकाल प्रत्येकजण आपली मायबोली मराठी सोडून इतर भाषांना जास्त प्राधान्य देताना दिसून येत आहे. म्हणूनच जास्तीत जास्त माहिती आपल्या मायबोलीत पुरवण्याचा आमचा ध्येय आहे आणि त्यासाठीच हा छोटासा प्रयत्न. मराठीदुर्ग वर पुरवलेली माहिती शैक्षणिक उद्देशासाठी / अभ्यासासाठी दिलेली असून विविध पुस्तके, वेबसाईट,वर्तमानपत्रे आणि अशाच इतर स्रोतातून संकलित केलेली आहे. मराठीदुर्गच्या या प्रयत्नात काही उणीव असल्यास मराठीदुर्गच्या आपल्या सूचना आणि अभिप्रायाचे नेहमीच स्वागत करेल.

ध्येय…

“ ध्येय ठेव पर्वतासारखं, दुरूनही स्पष्ट दिसणार …
कितीही असाध्य वाटलं तरी, स्वतःकडे खेचणार ….”
-“ मराठीदुर्ग ”

 

                                                                ”