वर्णांचे प्रकार- उच्चारस्थानानुसार

/ मराठी व्याकरण

तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना तोंडातल्या ज्या भागांचा जास्त वापर होतो त्या भागाचे नाव त्या ध्वनीला दिले गेले आहे.

१) कंठ्य

ज्या वर्णांचा उच्चार पडजिभेजवळ किंवा कंठातून होतो अशा वर्णांना कंठ्य वर्ण म्हणतात.

समाविष्ट असलेले स्वर -अ, आ

समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी – क, ख, ग, घ, ङ, ह,अ:

२) तालव्य

ज्या वर्णांचा उच्चार टाळूतून/तालूतून   होतो अशा वर्णांना तालव्य वर्ण म्हणतात.

समाविष्ट असलेले स्वर -इ, ई

समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी- च, छ, ज, झ, त्र,य,श

३) मूर्धन्य

ज्या वर्णांचा उच्चार कंठ व टाळूतून/तालूतून होतो अशा वर्णांना मूर्धन्य वर्ण म्हणतात.

समाविष्ट असलेले स्वर -ऋ

समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी- ट, ठ, ड, ढ, ण, र, ष, ळ

४) दंत्य

ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ दातांना स्पर्श करते किंवा दातांचा आधार घेतला जातो अशा वर्णांना दंत्य वर्ण म्हणतात.

समाविष्ट असलेले स्वर -लृ

समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी- त, थ, द, ध, न, ल, स

५) ओष्ठ्य

ज्या वर्णांचा उच्चार करताना ओठांचा एकमेकांना स्पर्श होतो किंवा ओठांचा आधार घेतला जातो अशा वर्णांना  ओष्ठ्य वर्ण म्हणतात.

समाविष्ट असलेले स्वर -उ, ऊ

समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी- प, फ, ब, भ, म

६) कंठतालव्य

ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ आणि टाळू / तालू चा वापर करावा लागतो अशा वर्णांना  कंठतालव्य वर्ण म्हणतात.

समाविष्ट असलेले स्वर – ए, ऐ

७)  कंठौष्ठ्य

ज्या वर्णांचा उच्चार करताना कंठ आणि ओठांचा वापर करावा लागतो अशा वर्णांना  कंठौष्ठ्य वर्ण म्हणतात.

समाविष्ट असलेले स्वर – ओ, औ

८) दंतौष्ठ्य

ज्या वर्णांचा उच्चार करताना दात आणि ओठांचा वापर करावा लागतो अशा वर्णांना  दंतौष्ठ्य वर्ण म्हणतात.

समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी-  व

९) दंततालव्य

ज्या वर्णांचा उच्चार करताना दात आणि टाळू / तालू चा वापर करावा लागतो अशा वर्णांना  दंततालव्य वर्ण म्हणतात.

समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी- च, छ, ज, झ

१०) नासिक्य

ज्या वर्णांचा उच्चार नाकातून होतो अशा वर्णांना  नासिक्य वर्ण म्हणतात.

समाविष्ट असलेले व्यंजने/ स्वरादी- अं

Share this Post