संधी:-व्यंजनसंधी
दोन व्यंजने किंवा या दोन व्यंजनापैकी दूसरा वर्ण स्वर असेल तर त्याला मिळून तयार होणार्या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात.
व्यंजनसंधीचे खालील प्रमाणे प्रकार आहेत.
१) प्रथम व्यंजन संधी –
काही ठिकाणी संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण मृदु व्यंजन असेल म्हणजेच ग, ज, ड, द्, ब यांच्यापैकी असेल तर संधी होत असतांना त्याच्या जागी त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन -क, च, ट, त, प येऊन संधी होते त्याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात.
उदा.
आपत्काल = आपद्+काल
विपत्काल = विपद्+काल
वाक्पति = वाग्+पति
वाक्तांडव = वाग्+तांडव
२) तृतीय व्यंजन संधी –
काही ठिकाणी संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क, च, ट, त, प यापैकी कोणताही वर्ण आल्यास त्यापासून संधी होत असतांना त्या वर्णाचे जागी त्याच वर्गातील तृतीय व्यंजन म्हणजेच – ग,ज,ड,द,ब येते या संधीला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात.
उदा.
सदाचार- सत्+आचार
दिग्विजय – दिक्+ विजय
आजादी – अच्+ आदी
सदानंद- सत्+आनंद
३) अनुनासिक संधी –
काही ठिकाणी संधी होत असतांना पहिल्या पाच वर्गातील (क, च, ट, त, प ) कोणत्याही व्यंजनापूढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्यात वर्गातील अनुनासिक (ड, त्र, ण, न, म) येऊन संधी होते, यालाच ‘अनुनासिक संधी’ असे म्हणतात.
उदा.
चिन्मय- चित्+ मय
वाड्निश्चय – वाक्+निश्चय
षण्मास – षट्+मास
जगन्नाथ – जगत्+नाथ
४) त ची विशेष व्यंजन संधी –
१) जर त या व्यंजनापुढे च किंवा छ हे वर्ण आले तर त बद्दल च येतो.
उदा.- उच्छेद- उत्+ छेद
२) जर त या व्यंजनापुढे ट किंवा ठ हे वर्ण आले तर त बद्दल ट येतो.
उदा.- तट्टीका – तत्+ टीका
३) जर त या व्यंजनापुढे ज किंवा झ हे वर्ण आले तर त बद्दल ज येतो.
उदा.- सज्जन- सत् + जन
४) जर त या व्यंजनापुढे ल् हा वर्ण आला तर त बद्दल ल् येतो.
उदा.- तल्लीन – तत्+ लीन
५) जर त या व्यंजनापुढे श हा वर्ण आला तर त बद्दल च होतो व पूढील श बद्दल छ येतो
उदा.-उच्छिष्ट -उत् + शिष्ट
६) जर त या व्यंजनापुढे ह वर्ण आला तर त बद्दल द् होतो व पूढील ह् बद्दल ध् येतो.
उदा.-तध्दित- तत्+ हित
५) म ची संधी
जर ‘म्’ पुढे स्वर आल्यास तो स्वर म मध्ये मिसळून जातो पण व्यंजन आले तर ‘म्’ चा लोप होऊन मागील अक्षरांवर अनुस्वार किंवा बिंदू येतो.
उदा.- संगती – सम्+गती
६) छ ची संधी
जर ‘छ’ पूर्वी ऱ्हस्व स्वर आला असेल तर त्या दोघांमध्ये ‘च्’ हा वर्ण येतो.
उदा. रत्नछाया- रत्न+छाया
७) काही विशेष नियम
१) प्रथम पदाच्या शेवटी पहिल्या रांगेतील कठोर वर्ण (क, च, ट, त, प ) आले आणि परत त्यापुढे कठोर वर्ण आले तर पहिला कठोर वर्ण तसाच राहतो आणि पुढील वर्णाबरोबर संधी होते.
उदा.- उत्तम – उत् + तम