केवल प्रयोगी अव्यय

/ मराठी व्याकरण

आपल्या मनातील हर्ष, शोक, तिरस्कार,आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्‍या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात.

केवलप्रयोगी अव्यये कोणता भाव व्यक्त करतात त्यावरून त्यांचे खालीलप्रमाणे प्रकार पडतात.

१) हर्षदर्शक : अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो

उदा. वा! काय धमाल उडवली त्याने!

२) शोकदर्शक : आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे, देवा रे, रामा रे,शिव -शिव .

उदा. अरेरे! खूप वाईट झाले.

३) आश्चर्यदर्शक : ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या

उदा. बापरे ! केवढा मोठा साप !

४) प्रशंसादर्शक : छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड खाशी

उदा. शाब्बास! तू चांगले गुण मिळवलेस.

५) संमतीदर्शक : ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा

उदा. ठीक !  हे अतिशय उत्तम झाले.

६) विरोधदर्शक : छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च

उदा. छे-छे! असे करू नकोस.

७) तिरस्कारदर्शक : शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी

उदा. शी ! काय हे कपडे तुझे !

८) संबोधनदर्शक : अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे

उदा. अग ! ऐकलंस का ?

९) मौनदर्शक : चुप, चुपचाप, गप, गुपचुप

उदा. चुप! जास्त बोलू नको.

१०) वाक्यमय : संपूर्ण वाक्यच काही वेळा केवलप्रयोगी अव्यय/ उद्गारवाचक असते.

उदा. काय मौज!

Share this Post