मराठी वर्णमाला

/ मराठी व्याकरण

वर्णमाला –

वर्ण-

तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात.

मराठीत खालीलपैकी ४८ वर्ण आहेत.

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:

क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ

काही ठिकाणी ॲ, ऑ हे (इंग्रजी) स्वर आणि क्ष , ज्ञ  हे संयुक्त व्यंजन म्हणून उल्लेख आलेला आहे.

१) स्वर –

ओठांचा एकमेकांशी तसेच जिभेचा मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श न होता जो तोंडावाटे ध्वनी बाहेर पडतो त्याला स्वर असे म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाले तर ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात.

स्वरांचे प्रकार –

१) ऱ्हस्व स्वर – काही स्वरांचा उच्चार आखूड होतो म्हणजेच उच्चार करण्यास कमी वेळ लागतो अशा स्वरांना ऱ्हस्व स्वर म्हणतात.

अ, इ, उ , ऋ, लृ – हे पाच ऱ्हस्व स्वर आहेत.

२) दीर्घ स्वर-काही स्वरांचा उच्चार लांबट होतो म्हणजेच उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो अशा स्वरांना दीर्घ स्वर म्हणतात.

आ, ई , ऊ – हे तीन दीर्घ स्वर आहेत.

३) संयुक्त स्वर -दोन स्वर मिळून जे स्वर तयार होतात त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात.

खालील चार स्वर हे संयुक्त स्वर आहेत.

     ए – अ+इ/ई

    ऐ – आ+इ/ई

    ओ – अ+उ/ऊ

    औ – आ+उ/ऊ

४) इंग्रजी स्वर – इंग्रजीतून मराठीत आलेले काही स्वर (काही ठिकाणी याचा उल्लेख आढळतो ) – ॲ,ऑ

स्वरांचे इतर काही प्रकार-

१) सजातीय स्वर -एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे संबोधले जाते.

उदा. अ-आ, उ-ऊ,

२) विजातीय स्वर-भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे संबोधले जाते.

उदा. अ-ई, उ-ए,

२) स्वरादी- 

स्वर + आदी – स्वरादी- ज्याच्या आधी स्वर आहे त्याला स्वरादी म्हणतात .

खालीलप्रमाणे स्वरादीचे दोन प्रकार आहेत –

  अ) अनुस्वार -(अं)- एखाद्या अक्षरावर अनुस्वार दिला असेल तर पहिल्यांदा त्या अक्षराचा उच्चार करावा लागतो आणि नंतर अनुस्वाराचा उच्चार होतो. स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार म्हणतात.

उदा. – शंकर, नंतर, चंचल

 ब) विसर्ग- (अ:)- विसर्ग म्हणजे श्वास सोडणे होय. अ: चा उच्चार करताना तोंडातून हवेचा विसर्ग होतो म्हणून या वर्णांना  विसर्ग असे म्हणतात.

उदा. दु:ख:, स्वत:

३) व्यंजने-

ज्या वर्णांचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो तसेच हवेचा मार्ग अडवून शेवटी स्वरांची मदत घ्यावी लागते अशा वर्णांचा व्यंजनात समावेश होतो.

व्यंजनाचे सहा प्रकारात वर्गीकरण  केले जाते.

१)स्पर्श व्यंजने(२५ )

२) अर्धस्वर व्यंजने(४ )

३) उष्मा, घर्षक व्यंजने(३ )

४) महाप्राण व्यंजन (१ )

५)   स्वतंत्र व्यंजन (१ )

६) संयुक्त व्यंजने (२)

१) स्पर्श व्यंजने-

वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णांचा उच्चार करताना  मुखातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात.

स्पर्श व्यंजनांचे ३ प्रकार आहेत –

१) कठोर व्यंजने- काही  वर्णांचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो अशा वर्णांना कठोर वर्ण असे म्हणतात.

उदा.-क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ

२) मृदू व्यंजने- काही  वर्णांचा उच्चार सौम्यपणे होतो अशा वर्णांना मृद वर्ण असे म्हणतात.

उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ

३) अनुनासिके – ज्या वर्णांचा काही अंशी नाकातूनही होतो त्याला अनुनासिक असे म्हणतात.

उदा. ड, त्र, ण, न, म

२) अर्धस्वर –

‘य्, र्, ल्, व्’ यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ‘इ, ऋ, लृ, उ’ या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच आहेत आणि  या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे; म्हणून त्यांना अर्धस्वर (अंतस्थ) म्हणतात. अर्धस्वर एकूण चार आहेत – य्, र्, व्, ल् . 

३) उष्मे-

काही वर्णांचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते अशा वर्णांना उष्मे (घर्षक) असे म्हणतात. यामध्ये तीन वर्णांचा  समावेश होतो-  श्, ष्, स्

४) महाप्राण –

काही वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेत फेकली जाते त्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात.

यामध्ये चौदा वर्णांचा  समावेश होतो-

‘ख्, घ्, छ्, झ्, ठ्, ढ्, थ्, ध्, फ्, भ्, श्, ष्, स्, ह्’

५) अल्पप्राण-

ज्या वर्णांत ह् ची छटा नसते त्या व्यंजनांना अल्पप्राण म्हणतात.

क्,ग्,ङ,च्,ज्,त्र,ट,ड,ण्,त्,द,न्,प्,ब्,म्,य,र,ल्,व्,ळ, या व्यंजनाना अल्पप्राण असे म्हणतात.

 ६) स्वतंत्र व्यंजने –

ळ हे स्वतंत्र व्यंजन आहे.

७) संयुक्त व्यंजने –

काही ठिकाणी क्ष् आणि ज्ञ याना संयुक्त व्यंजने मानले आहे.

Share this Post