वचन व त्याचे प्रकार

/ मराठी व्याकरण

वचन विचार

नामावरून जसे त्या नामाचे लिंग समजते त्याचप्रमाणे नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की त्या अनेक आहेत हे ही कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात.

वचनांचे पुढीलप्रमाणे दोन प्रकार पडतात.

१) एकवचन

२) अनेकवचन/ बहुवचन

वचनसंबंधीचे नियम-

अ. पुल्लिंगी नामाचे अनेक वचन

१) ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेक वचन ‘ए’ कारान्त होते.

उदा-

राजा – राजे

झरा – झरे

बगळा – बगळे 

मुलगा – मुलगे

ससा – ससे

घोडा – घोडे

आंबा – आंबे

कोंबडा – कोंबडे

वाडा – वाडे

आरसा – आरसे  

२) ‘आ’ कारान्त शिवाय इतर पुल्लिंगी नामांची रुपे दोन्ही वचनात सारखीच आढळतात.

 उदा –

हत्ती – हत्ती

पक्षी – पक्षी

देव – देव

वाघ – वाघ

लाडू – लाडू

उंदीर – उंदीर

गरुड – गरुड

कवी – कवी

बैल – बैल

पेरू – पेरू

ब . स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन

१) ‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन काही नामांसाठी ‘आ’ कारान्त तर काही नामांसाठी ‘ई’ कारान्त होते.

 उदा –

भिंत – भिंती

बाहुली – बाहुल्या

वेळ – वेळा

चूक – चुका

डाळ – डाळी

चूल – चुली

वात – वाती

वीट – वीटा

सून – सुना

२) ‘य’ नंतर ‘ई’आल्यानंतर उच्चरमध्ये ‘य’ लोप पावतो.

उदा-

गाय – गाई (गायी )

३) ‘आ, ई, ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामांचे एकवचन आणि अनेकवचन सारखेच असते.

उदा –

भाषा – भाषा

पूजा – पूजा

गती – गती

दिशा – दिशा

सभा – सभा

मैत्री – मैत्री

४) ‘ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन ‘या’ कारान्त होते.

 उदा-

वाटी – वाट्या

नदी – नद्या

बाई – बाया

बी – बिया

टाचणी – टाचण्या

पाटी – पाट्या 

काठी – काठ्या

टोपी – टोप्या

वही – वह्या

चांदणी – चांदण्या

भाकरी – भाकर्‍या

५) ‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी अनेक वचन ‘वा’ कारान्त होते.

उदा-

पिसू – पिसवा

ऊ – ऊवा

पीसु – पीसवा

सासू –  सासवा

जळू – जळवा

क . नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन

१) ‘ऊ’ कारान्त नपुंसक  लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए ’ कारान्त होते.

उदा-

वासरू – वासरे

पाखरू – पाखरे

२) ‘ए’ कारान्त नपुंसक  लिंगी नामाचे अनेकवचन ‘ई’ कारान्त होते.

उदा-

केळे – केळी

गाणे – गाणी

खेडे – खेडी

मडके – मडकी

३) ‘अ’ कारान्त नपुंसक  लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होते.

उदा-

घर – घरे

दार – दारे

घड्याळ – घड्याळे

ड. इतर काही नियम

१) काही नामांचे अनेकवचनाचे रूप बदलत नाही.

उदा.-

सोने – सोने

बाजू – बाजू

युवती – युवती

पाणी – पाणी

वळू – वाळू 

२) काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. त्यांचे एकवचन होत नाही.

उदा :

डोहाळे

कांजीन्या

रोमांच

क्लेश

हाल

Share this Post