विभक्ती व त्याचे प्रकार

/ मराठी व्याकरण

  • विभक्ती –

नामांचा किंवा सर्वनामांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा संबंध ज्या विकारांनी दाखविला  जातो त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.

  • कारक

वाक्यातील शब्दांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध म्हणजे कारक होय.

  • कारकार्थ-

वाक्यातील नामे /सर्वनामे जर क्रियापदांशी संबंध दर्शवित असतील तर त्यांना ‘कारकार्थ’ असे म्हणतात

  • उपपदार्थ-

नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना ‘उपपदार्थ’ असे म्हणतात.

  • प्रत्यय-

नामांना किंवा सर्वनामांना विभक्तीत रूपांतर करताना त्यांना जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.

नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध आठ प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचेही एकूण आठ प्रकार पडतात.

विभक्तीचे अर्थ-

अ) कारकार्थ/ कारकसंबंध

वाक्यातील नामे /सर्वनामे जर क्रियापदांशी संबंध दर्शवित असतील तर त्यांना ‘कारकार्थ’ असे म्हणतात.

विभक्तीचे मुख्य सहा कारकार्थ आहेत

१) कर्ता

२) कर्म

३) करण

४) संप्रदान

५) अपादान (वियोग)

६) अधिकरण

१) कर्ता –

 वाक्यामध्ये क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणाऱ्यास ‘कर्ता’ असे म्हणतात.

-कधी कधी कर्त्यांची विभक्ती प्रथमा असते.

-प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता असतो.

उदा. सुरेश पुस्तक वाचतो.

२) कर्म –

वाक्यामध्ये कर्त्यांने केलेली क्रिया कोणावर तरी घडलेली असते किंवा घडणार असते आणि हे सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म’ होय.

प्रत्यक्ष कर्माची विभक्ती व्दितीया असते.

अप्रत्यक्ष कर्माची विभक्तीअप्रत्यक्ष चतुर्थी असते.

द्वितीयेचा कारकार्थ कर्म असतो.

उदा. राम रावणास मारतो.

३) करण –

वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्याला ‘करण’ असे म्हणतात. करण म्हणजे क्रियेच साधन होय.

तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण आहे.

उदा. रामने चाकूने सफरचंद कापले .

४) संप्रदान –

जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान ज्याला करण्यात येते त्या शब्दाला किंवा क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला व स्थानाला ‘संप्रदान’ असे म्हणतात.

 चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान होय.

उदा.  मी गुरुजींना दक्षिणा दिली.

५) आपदान (वियोग) –

 क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती किंवा वस्तू दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने त्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा असतो त्यास ‘अपादान’ म्हणतात.

पंचमीचा कारकार्थ आपदान आहे.

उदा. मी बागेतून आताच घरी आलो.

६) अधिकरण (आश्रय/ स्थान) –

वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियचे स्थान किंवा काळ दर्शविणार्‍या शब्दांच्या संबंधास ‘अधिकरण’ असे म्हणतात.

सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकारण हा आहे

उदा. दररोज सकाळी मी मंदिरात जातो.

सामान्य रूप

नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी तसेच शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामाच्या मूळ स्वरुपात जो बदल होतो त्याला ‘सामान्य रूप’ असे म्हणतात.

उदा-

पाणी-  पाण्यास, पाण्याला, पाण्याने, पाण्याचा – सामान्यरूप – ‘पाण्या’

अनुक्रमांकरूपांतरउदाहरण
अ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे रूप ‘आ’ कारान्त होते. खांब-खांबास
डोंगर- डोंगरात
दोर-दोरास/दोराने
‘आ/ ए’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘या’ कारान्त होते.मळा- मळ्यात
घोडा-घोड्यास, घोड्याला, घोड्याचा
‘ई’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ‘या’ कारान्त होते.माळी-माळ्याचा, माळ्यास
शेतकरी- शेतकऱ्याला
 ‘ऊ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ‘वा’ कारान्त होते.भाऊ-भावास, भावाचा, भावाने
नातू-नातवाला, नातवास, नातवाचा
नामांचे सामान्यरूप आहे तसेत दीर्घांतामध्ये राहते.कवी – कावीला
नीती – नीतीचा
‘ओ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ‘ओ’ कारान्त राहते.किलो-किलोस
धनको-धनकोस
 ‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ‘ए’ कारान्त होते व अनेकवचनात ‘आ’ कारान्त होते.वीट- विटेचा -विटांचा
जीभ -जिभेला -जिभांचा
कधी कधी  ‘अ’ कारान्त स्त्रीलिंग नामाचे सामान्यरूप ‘ई’ कारान्त होते.भिंत-भिंतीस
विहीर-विहिरीस
‘आ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ‘ए’ कारान्त होते.शाळा – शाळेत
भाषा – भाषेचा
१० ‘ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात ‘ई’ कारान्त व अनेकवचनात ‘ई’ कारान्त किंवा ‘य’ कारान्त होते.नदी- नदीचा- नद्यांचा
दासी- दासीला – दासींचा
११ ‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप होत नाही पण काही वेळा ते ‘वा’ कारान्त होते.काकू-काकूस
वधू – वधूचा
१२ ‘ओ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात होत नाही व अनेकवचनात ‘ओ’ कारान्त होते.बायको- बायकोला
१३‘अ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘आ’ कारान्त होते.मूल- मुलाला
झाड- झाडाचा
१४ ‘ई’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.पाणी-पाण्यात
मोती-मोत्याचा
१५ ‘ऊ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘आ’ कारान्त होते.लिंबू- लिंबाचे
कोकरू- कोकराचे
१६ ‘ऊ’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘वा’ कारान्त होते.कुंकू-कुंकवाचा
आसू- आसवाने
१७‘ए’ कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.गाणे-गाण्याला
तळे- तळ्यात
१८पुल्लिंगी शब्दांमध्ये काही वेळा शेवटच्या शब्दाचा  ‘सा’ चा  ‘शा ’होतो.पैसा- पैशाने
ससा- सशास
१९ ‘अ’ कारान्त ‘ई’ कारान्त व ‘ऊ’ कारान्त विशेषणाचे सामान्यरूप होत नाही.तो एक गरीब शेतकरी /मुलगा /शिक्षक /नोकर आहे.
२०अ कारान्त विशेषणाचा नामाप्रमाणे वापर केल्यास त्यांची नामाप्रमाणेच सामान्यरूपे होतात.श्रीमंत माणसांचा सगळे आदर करतात – श्रीमंतांचा सगळे आदर करतात.
२१‘आ’ कारान्त विशेषणांचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.गोरी मुलगी – गोऱ्या मुलीला
Share this Post