शब्दयोगी अव्यय

/ मराठी व्याकरण

वाक्यामधील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यामधील इतर शब्दांशी असणारा संबंध दाखविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा.

त्याच्याजवळ सायकल आहे.

आमच्या घरासमोर विहीर आहे.

आमच्या शाळेसमोर एक झाड आहे.

मुले मैदानापर्यंत चालत गेली.

शब्दयोगी अव्ययांची काही वैशिष्ट्ये

-पुढे,मागे, वर, खाली, आत, बाहेर, जवळ, नंतर – यांसारखे शब्द मूळ क्रियाविशेषण आहेत पण नामाला जोडून आल्यामुळे ती शब्दयोगी अव्यये होतात.

-शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही म्हणजेच ते अविकारी असतात.

-शब्दयोगी अव्यये प्रामुख्याने नामाला किंवा नामाचे कार्य करणार्‍या शब्दाला जोडून येतात. पण कधी कधी ते क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून येतात.

-शब्दयोगी अव्ययांनी वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी असलेला संबंध दर्शविला जातो. 

-शब्दयोगी अव्ययांना थोडासातरी अर्थ असतो आणि ते विभक्ती प्रत्ययांपेक्षा अधिक कार्य करू शकतात तर विभक्ती प्रत्ययांना कोणताच  अर्थ नसतो.

-विभक्ती प्रत्यय हे फक्त नाम किंवा सर्वनाम यांनाच जोडले जाऊ शकतात पण शब्दयोगी अव्यये नाम, सर्वनाम, विशेषण, धातू अशा शब्दांच्या जातींना जोडले जाऊ शकतात.

शब्दयोगी अव्ययवाचे खालील प्रकार पडतात.

  • कालवाचक – पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावेतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून.

उदा.

दुपारनंतर सिनेमाला जाऊ.

घरी जाण्यापूर्वी काम पूर्ण करा.

  • स्थलवाचक – आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक.

उदा.

नदीजवळ एक मंदिर आहे.

आमच्या घरासमोर विहीर आहे.

  • करणवाचक – मुळे, योगे, करून, कडून, व्दारा, करवी, हाती

उदा.

वाऱ्यामुळे खूप धूळ उडाली.

चेकद्वारा व्यवहार करावेत.

  • हेतुवाचक – साठी, कारणे, करिता, अथा, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव

उदा.

उपचारासाठी तो पुण्याला गेला.

सहलीला जाण्याकरिता मला पैसे लागतील.

  • व्यक्तिरेखा वाचक – शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता

उदा.

मी तुझ्याशिवाय सहलीला जाणार नाही.

तुझ्याशिवाय सहलीला मजा येणार नाही.

  • तुलनावाचक – पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस

उदा.

महेशपेक्षा सुरेश हुशार आहे.

मुलांमध्ये सुरेश हुशार आहे.

  • योग्यतावाचक – योग्य, सारखा, समान, सम, सयान, प्रमाणे, बरहुकूम

उदा.

हे पाणी पिण्यालायक नाही.

ही फळे खाण्यायोग्य आहेत.

  • कैवल्यवाचक – मात्र, ना, पण, फक्त, केवळ

उदा.

ज्ञानानेच मनुष्याची प्रगती होऊ शकते.

फक्त देव तुला यातून वाचवू शकतो.

  • संग्रहवाचक – सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त

उदा.

मी सुद्धा बागेत खेळायला येईन.

मी सुद्धा तुला मदत कारेन.

  • संबंधवाचक – विषयी, विशी, विषयी

उदा.

सह्याद्री प्रकल्पाविषयी वर्तमानपत्रात लेख छापला आहे.

रामाविषयी माझ्या मनात खूप श्रद्धा आहे.

  • साहचर्यवाचक – बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत

उदा.

काकांबरोबर तो पुण्याला गेला.

तो मुलाबाळांसह निघून गेला.

  • भागवाचक – पैकी, पोटी, आतून

उदा.

महिन्यातून एखाद्या दिवशी बाहेर जेवणे होते.

व्याजापोटी सुरेश महिन्याला शंभर रुपये भरतो.

  • विनिमयवाचक – बद्दल, ऐवजी, जागी, बदली

उदा.

पुस्तकांऐवजी वही द्या.

  • दिकवाचक – प्रत, प्रति, कडे, लागी

उदा.

तुझ्याकडे दहावीची पुस्तके आहेत का ?

गुरुजनांप्रती आदर बाळगावा.

  • विरोधावाचक – विरुद्ध, वीण, उलटे, उलट

उदा.

आज क्रिकेटच्या सामन्यात भारताविरुद्ध बांगलादेश उतरेल.

  • परिणामवाचक – भर

उदा.

दिवसभर खूप पाऊस होता.

गावभर फिरणे हा त्याचा नित्यक्रम.

  • पूर्णतावाचक- पुरता, पुरेसा

उदा.

घरात धान्य खरेदीपुरते पैसे आहेत.

Share this Post