संधी:- विसर्ग संधी
एकापाठोपाठ एक येणारे विसर्ग व स्वर किंवा विसर्ग व व्यंजन यांच्या एकत्र होणार्या क्रियेला ‘विसर्ग संधी’ असे म्हणतात.
विसर्ग संधीचे काही नियम खालीलप्रमाणे आहेत-
१) विसर्गाच्या मागे ‘अ’ हा स्वर असून पुढे पाच गटापैकी (क, च, ट, त, प) कोणतेही मृदु व्यंजन आल्यास विसर्गाचा ‘उ’ होतो व तो मागील ‘अ’ मध्ये मिळून त्याचा ‘ओ’ होतो यास ‘उकार संधी’ म्हणतात.
उदा-
मनोरथ – मन:+रथ
वयोमान -वय: + मान
२) जर विसर्गाच्या मागे ‘इ’ किंवा ‘ऊ’ आले आणि पुढे क्, ख्, प्, फ् यापैकी कोणताही वर्ण आला तर विसर्गाचा ‘ष’ होतो.
उदा.
निष्कारण- नि:+कारण
निष्पाप – नि:+पाप
३) विसर्गाच्या मागे अ किंवा आ याव्यतिरिक्त कोणताही स्वर असून पुढे मृदु वर्ण आला तर विसर्गाचा र होऊन संधी होते.
उदा-
निरंतर- नि: + अंतर
दुर्योधन – दु: + योधन
४) जर विसर्गाच्या मागे ‘अ’ हा स्वर आला आणि पुढे क्, ख्, प्, फ् यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग तसाच राहतो पण पुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.
उदा.
अतएव- अत:+एव
इतउत्तर- इत:+उत्तर
५) पदाच्या शेवटी ‘र’ आला असेल आणि त्याच्यापुढे कठोर व्यंजन आले असेल तर त्या ‘र’ चा विसर्ग होतो.
उदा.
अंत:करण- अंतर+करण
६) पदाच्या शेवटी ‘स’ आला असेल आणि त्यांच्यापुढे कोणतेही व्यंजन आल्यास ‘स’ विसर्ग होतो.
उदा.
तेज:कण- तेजस्+कण
७) विसर्गाच्या नंतर जर इ किंवा उ आले आणि पुढे मृदू वर्ण आले तर विसर्गाचा र होतो पण पुढे परत र आला तर मागील र चा लोप होतो व त्याच्या पाठीमागील ऱ्हस्व स्वराचा दीर्घ स्वर होतो.
उदा.
नि:संदेह – नि: + संदेह
८) विसर्गाच्या पुढे जर च्, छ् आले तर विसर्गाचा ‘श’ होतो. त्, थ्, आले तर ‘स’ होतो.
उदा.
निस्तेज- नि:+तेज
निश्चल – नि:+ चल
९) जेव्हा विसर्गाच्या ऐवजी येणार्या ‘र’ च्या मागे ‘अ’ व पुढे मृदु वर्ण आला तर तो ‘र’ तसाच राहून संधी होते.
उदा.
पुनर्जन्म- पुनर+जन्म
१०) विसर्गाच्या पुढे जर ट, ठ आले तर विसर्गाचा ‘ष्’ होतो.
उदा.
रामष्टीकते- राम:+ टीकते
११) जर विसर्गाच्या पुढे ष्, स्, श् आले तर विसर्ग तसाच कायम राहतो.
उदा.
दुःशासन- दुः+शासन
सीमा संधी
वाक्यातील विराम बदलला कि वाक्याचा अर्थ बदलतो यास सीमा संधी असे म्हणतात.
उदा .
ते कामगार झाले – ते काम गार झाले .