काळ

/ मराठी व्याकरण

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात आणि या क्रियापदावरून वाक्यात क्रिया केव्हा घडते याचा बोध होतो त्याला काळ असे म्हणतात.

काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.

अ) वर्तमान काळ

ब) भूतकाळ

क) भविष्यकाळ

 अ) वर्तमानकाळ :

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानात म्हणजे आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो.

उदा.

१ )राधा पुस्तक वाचते.

२) महेश पत्र लिहतो.

३) सुरेश कबड्डी खेळतो.

४) महेश आंबा खातो.

वर्तमानकाळाचे खालीलप्रमाणे चार उपप्रकार पडतात.

१) साधा वर्तमानकाळ

वाक्यामध्ये जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे कळते तेव्हा त्या वाक्याचा काळ हा साधा वर्तमानकाळ असतो.

उदा. 

१ )राधा पुस्तक वाचते.

२) महेश पत्र लिहतो.

३) सुरेश कबड्डी खेळतो.

४) महेश आंबा खातो

 २) अपूर्ण वर्तमानकाळ / चालू वर्तमानकाळ

जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असून अजून अपूर्ण असल्याचा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा अपूर्ण वर्तमानकाळ असतो.

उदा. 

१ )राधा पुस्तक वाचत आहे .

२) महेश पत्र लिहत आहे .

३) सुरेश कबड्डी खेळत आहे .

४) महेश आंबा खात आहे.

३) पूर्ण वर्तमानकाळ

वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे असे जेव्हा समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ हा पूर्ण वर्तमानकाळ असतो.

उदा.

१ ) राधाने  पुस्तक वाचले आहे .

२) महेशने पत्र लिहिले आहे .

3) महेशने आंबा खाल्ला आहे .

४) मी अभ्यास केला आहे.

४) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ

जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन त्याने दर्शविलेली क्रिया ही वर्तमानकाळात सतत घडत असल्याची रीत दाखवत असेल तर त्या काळाला  रीती वर्तमानकाळ असे म्हणतात.

उदा.    

१) राधा रोज गाण्याचा रियाज करते.

२) मी रोज व्यायाम करतो.

३) महेश दररोज दूध पितो.

४) गणेश रोज पुस्तक वाचतो.

ब)  भूतकाळ :

वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे, असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

१) राधाने पुस्तक वाचले. .

२) महेशने पत्र लिहिले.

३) मी अभ्यास केला .

४) महेशने आंबा खाल्ला.

भूतकाळचे खालीलप्रमाणे चार उपप्रकार पडतात.

१) साधा भूतकाळ

वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ असे म्हणतात.

उदा.

१) राधाने पुस्तक वाचले.

२) महेशने पत्र लिहिले.

३) मी अभ्यास केला .

४) महेशने आंबा खाल्ला.

२) अपूर्ण/चालू भूतकाळ

जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच अजून अपूर्ण होती असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ असतो.

उदा.

१) राधा पुस्तक वाचत होती.

२) महेश पत्र लिहीत होता.

३) मी अभ्यास करत होतो.

४) महेशआंबा खात होता.

३) पूर्ण भूतकाळ

एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असे जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन कळते तेव्हा तो काळ पूर्ण भूतकाळ असतो.

उदा.

१ ) राधाने  पुस्तक वाचले होते .

२) महेशने पत्र लिहिले होते .

3) महेशने आंबा खाल्ला होता.

४) मी अभ्यास केला होता.

४) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ

भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते,असे जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन कळते तेव्हा तो काळ चालू-पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ असतो.

उदा.

१) राधा रोज गाण्याचा रियाज करत होती / असे .

२) मी रोज व्यायाम करत असे / होतो.

३) महेश दररोज दूध पित होता / असे.

४) गणेश रोज पुस्तक वाचत होता / असे.

क) भविष्यकाळ

वाक्यात क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, असे समजते तेव्हा त्या वाक्यातील काळ हा ‘भविष्यकाळ’ असतो.

उदा.

१) राधा पुस्तक वाचेल.

२) मी मंदिरात जाईल.

३) मी अभ्यास करेन.

४) उद्या पाऊस पडेल.

१) साधा भविष्यकाळ

वाक्यात क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात पुढे घडणार आहे, असे समजते तेव्हा त्या वाक्यातील काळ हा साधा भविष्यकाळ असतो.

उदा.

१) राधा पुस्तक वाचेल.

२) मी मंदिरात जाईल.

३) मी सिनेमाला जाईल.

४) उद्या पाऊस पडेल.

२) अपूर्ण / चालू भविष्यकाळ

वाक्यात एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल असे जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन कळते तेव्हा त्या वाक्यातील काळ हा अपूर्ण भविष्यकाळ असतो.

उदा.

१) राधा पुस्तक वाचत असेल.

२) मी मंदिरात जात असेल.

३) मी सिनेमाला जात असेल.

४) उद्या पाऊस पडत असेल.

३) पूर्ण भविष्यकाळ

वाक्यामध्ये एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते असे जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन समजते  तेव्हा त्या वाक्यातील काळ हा  पूर्ण भविष्यकाळ असतो.

उदा.

१) राधा पुस्तक वाचले असेल.

२) मी मंदिरात गेलो असेल.

३) मी सिनेमाला गेलो असेल.

४) उद्या पाऊस पडला असेल.

४) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ

वाक्यात जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन त्याने दर्शवलेली एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्या काळाला रीती/ चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात.

उदा.

१) राधा रोज गाण्याचा रियाज करत जाईल.

२) मी रोज व्यायाम करत जाईल.

३) महेश नियमित शाळेत जाईल.

४) मी दररोज वर्तमानपत्र वाचत जाईल.

Share this Post