शब्दांच्या शक्ती व त्याचे प्रकार

/ मराठी व्याकरण

शब्दांच्या शक्ती-

प्रत्येक शब्दामध्ये अपला अर्थ प्रकट करण्याची अंगभूत शक्ती असते त्याला शब्दांच्या शक्ती असे म्हणतात.

शब्दांच्या अंगी तीन प्रकारची शक्ती असते.

१) अभिधा

२) लक्षणा

३) व्यंजना

१) अभिधा

एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा एक शब्दशः, शब्दकोशगत सरळ व रुढ अर्थ समजतो किंवा त्याच्याशी निगडीत जो सर्वसामान्य अर्थ निघतो, त्या शब्दांच्या शक्तीस अभिधा असे म्हणतात.

उदा.

 मी एक साप पहिला.

 आमच्या घरी एक पोपटआहे.

अभिधा शब्दशक्तीचे पुढीलप्रमाणे तीन प्रकार पडतात.

अ) रूढी

यामध्ये शब्दांना रूढीने मिळालेला एकाच अर्थ असतो.

उदा.- त्याने वाघ पहिला.

ब) योग

यामध्ये शब्दांचा उगम तसेच उलगडा सांगता येतो आणि शब्दाला एकाच मूळ अर्थ असतो.

उदा- मी भारतीय आहे.

क) योगरूढी 

यामध्ये शब्दांचा उलगडा सांगता येतो आणि शब्दाला एकाच मूळ अर्थ असतो.

उदा- खग (ख -आकाश , ग – गमन करणारा ) – पक्षी

२) लक्षणा-

ज्यावेळी आपण शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो त्यावेळी शब्दांच्या शक्तीस लक्षणा असे म्हणतात व या शक्तीमुळे प्रगट होणा-या अर्थास ‘लक्षार्थ’ असे म्हणतात

उदा.

आम्ही गहू खातो.

तटावर बसा.

लक्षणा शब्दशक्तीचे पुढीलप्रमाणे दोन प्रकार पडतात.

अ) निरुढा लक्षणा

यामध्ये मूळ अर्थ न घेता रूढीने प्राप्त झालेला अर्थ घेतात.

उदा.- सातारा शूर आहे.

ब) प्रयोजनवती लक्षणा

प्रयोजनवती लक्षणाचे दोन प्रकार पडतात.

१) गौणी लक्षणा –

यामध्ये उपमेय आणि उपमान यांच्यातील गुणसाधर्म्य दाखवले जाते.

उदा. – कमल नयन पाहून मन झाले प्रसन्न.

२) शुद्ध लक्षणा –

यामध्ये गुणसामानतेशिवाय इतर पद्धतीने लक्ष्यार्थ घेतला जातो.

उदा.- भारत चीन युद्धात भारताचा विजय झाला . (भारतीय सेनेचा विजय झाला )

३) व्यंजना-

मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तिला ‘व्यंजना’ शक्ती असे म्हणतात. या शक्तीने प्रकट होणा-या अर्थाला ‘व्यंग्यार्थ’ असे म्हणतात

उदा.

घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले.

निघणारे अर्थ- शाळा सुटण्याची वेळ झाली, चहा पिण्याची वेळ झाली, कार्यालये बंद होण्याची वेळ झाली.

व्यंजना शब्दशक्तीचे पुढीलप्रमाणे दोन प्रकार पडतात.

अ) शाब्दी व्यंजना-

यामध्ये एकाच शब्दाचे दोन अर्थ निघतात.

कुस्करु नका ही सुमने । जरि वास नसे तिळ यास, तरी तुम्हास अर्पिली सु-मने॥  

ब) अर्थी व्यंजना-

यामध्ये मूळ अर्थासोबत वेगळा अर्थसुद्धा व्यक्त होतो.

घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले.

निघणारे अर्थ- शाळा सुटण्याची वेळ झाली, चहा पिण्याची वेळ झाली, कार्यालये बंद होण्याची वेळ झाली.

Share this Post