रस

/ मराठी व्याकरण

‘रस’ याचा शब्दशः अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात रस सहा आहेतः गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट व खारट . एखाद्या वस्तूत असलेली चव जशी आपण घेतो. तशीच एखाद्या उत्कृष्ट काव्यातून त्यातील चव वा गोडी आपण अनुभवतो; यालाच आपण ‘रसास्वाद’ म्हणतो.

साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.

मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.

साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.

१) स्थायीभाव – रती (शृंगार रस)

रसनिर्मिती – शृंगार

हा रस कुठे आढळतो – स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन

उदा .  १) डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

          २)  तुम्हावर केली मी मर्जी बहाल , नका सोडून जाऊ रंगमहाल.

          ३) या कातर वेळी पाहिजेस तू जवळीं.

२) स्थायीभाव – उत्साह (वीररस)

रसनिर्मिती – वीर

हा रस कुळे आढळतो – पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा. १) ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ .

        २) गर्जा जयजयकार, क्रांतिचा, गर्जा जयजयकार.

        ३) ) जिंकू किंवा मरु, भारतभूच्या शत्रूसंगे युध्द आमुचे सुरु

३) स्थायीभाव –शोक (करुण रस )

रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो – दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात

उदा – १) हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला

          २) आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

          ३) पोर खाटेवर मृत्युच्याच दारा, कुणा गरीबाचा तळमळे बिचारा.

४) स्थायीभाव – क्रोध (रौद्र  रस )

रसनिर्मिती – रौद्र

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन

उदा. १) पाड सिंहासने दृष्ट ती पालथी

            ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती

            मुकुट रंकासि दे, करटि भूपाप्रती

             झाड खट्खट् तुझे खड्ग रुद्रा.   

५) स्थायीभाव – हास (हास्य  रस )

रसनिर्मिती – हास्य

हा रस कुठे आढळतो – विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.

उदा. १) उपास मज लागला, सखेबाई, उपास मज लागला.

        २) परटा, येशिल कधि परतून ?

६) स्थायीभाव – भय (भयानक रस)

रसनिर्मिती- भयानक

हा रस कुळे आढळतो – युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.

उदा. १) तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा (बीभत्स रस )

रसनिर्मिती – बीभत्स

हा रस कुठे आढळतो – किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.

उदा. १) ही बोटे चघळीत काय बसले – हे राम रे – लाळ ही ।

         २)  काळी काया गळ्यातुनी जळमटे आहेत पन्नास ही.

         ३) शी !शी ! तोंड अती अमंगळ असे आधीच हे शेंबडे, आणी काजळ ओघळे वरुनि हे, त्यातूनि ही हे रडे !

८) स्थायीभाव – विस्मय (अदभुत रस )

रसनिर्मिती- अदभुत

हा रस कुठे आढळतो – आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात

उदा. १) आटपाट नगरात दुधाचे तळे                 

           तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे

           नगरातले लोक सारेच वेडे                 

           वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे

           आंघोळीला पाणी घेतात दुधाचे            

           डोक्याला तेल लावतात मधाचे

           फणसपोळीचे कपडे घालतात              

          सारे वेडे उलटे चालतात.

९) स्थायीभाव – शम (शांत रस )

रसनिर्मिती – शांत

हा रस कुळे आढळतो – परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.

उदा. १) उठि गोपालजी , जाइ धेनूकडे , पाहती सौंगडे वाट तूझी.

        २) सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

        ३) घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.

Share this Post