वाक्य व वाक्यांचे प्रकार
दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन वाक्य तयार होते. थोडक्यात सांगायचे झाले तर वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा समूह होय.वाक्याचा अर्थ स्पष्टपणे समजण्यासाठी वाक्यात आलेल्या प्रत्येक शब्दाचा (पदाचा) एकमेकांशी काय संबंध आहे हे कळणे महत्वाचे असते. व्याकरणामध्ये प्रत्येक वाक्यात कर्ता व क्रियापद हे वाक्याचे महत्वपूर्ण भाग मानले जातात. जर क्रियापद सकर्मक असेल तर त्या वाक्यातील कर्म हे तिसरा महत्वाचा भाग मानला जातो. या तीन शब्दाबरोबर वाक्यामध्ये विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यये, उभयान्वयी अव्यये, केवलप्रयोगी अव्यये आणि विधानपूरक इत्यादी शब्द येतात. वाक्यातील या शब्दांच्या एकमेकांशी असणाऱ्या संबंधातून आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळतो.
वाक्यांचे प्रकार-
वाक्यांचे पुढीलप्रमाणे दोन भागात विभाजन केले जाते.
अ) अर्थावरून पडणारे प्रकार
ब) वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार / स्वरूपावरुण पडणारे प्रकार
अ) अर्थावरून पडणारे प्रकार
१) विधांनार्थी वाक्य –
ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा .
– माझे वडील आज गावी गेले.
– मोहन खूप काम करतो.
– ती पत्र लिहिते.
२) प्रश्नार्थी वाक्य –
ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
– तू उद्या शाळेत जाणार आहेस का ?
– तू अभ्यास केलास का ?
– दवाखान्यात डॉक्टर आहेत का ?
३) उद्गारार्थी वाक्य –
ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
– केवढा मोठा धबधबा हा !
– किती ही गर्दी !
– काय ही बडबड !
४) होकारार्थी वाक्य –
ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .
उदा .
– मी आज गावाला जात आहे.
– रमेशला फिरायला आवडते.
– मोहन अभ्यास करतो.
५) नकारार्थी वाक्य –
ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
– मोहन मुळीच अभ्यास करत नाही.
– खोटे बोलू नये.
– मी जेवणार नाही.
६) स्वार्थी वाक्य –
ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
– मोहन शाळेत गेला.
– मोहन शाळेत जाईल.
७) आज्ञार्थी वाक्य –
ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
– मुलांनो, प्रार्थना म्हणा. (आज्ञा)
– देव तुझे कल्याण करो. (आशीर्वाद)
– कृपया सुटे पैसे द्या. (विनंती)
– देवा सर्वाना सुखी ठेव. (प्रार्थना)
– प्राणिमात्रांवर दया करा. (उपदेश)
८) विद्यर्थी वाक्य –
जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
– मुलांनी वडीलांची आज्ञा पाळावी. (कर्तव्य)
– माझा पहिला क्रमांक येईल असे वाटते. (शक्यता)
– त्या कामासाठी मोहनलाच सांगायला हवे. (योग्यता)
– आपण मंदिरात जायला हवे. (इच्छा)
९) संकेतार्थी वाक्य –
जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात.
उदा.
– पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता.
– जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.
– पाऊस पडला तर पेरणी करता येईल.
– लवकर पोहोचलो तर सिनेमा पाहायला जाऊ.
ब) वाक्यात असणार्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार / स्वरूपावरुण पडणारे प्रकार
१) केवल वाक्य –
ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच क्रियापद / विधेय असते त्यास केवल वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.
उदा.
– मनोज पुस्तक वाचतो.
– राधा पत्र लिहिते.
२) संयुक्त वाक्य –
जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य केवलवाक्ये खालील प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात अशा वाक्यास संयुक्त वाक्य म्हणतात.
१) समुच्चयबोधक – आणि,व,शिवाय
उदा.- मी सकाळी लवकर उठतो आणि व्यायाम करतो.
२) विकल्पबोधक – अथवा,किंवा,की
उदा.- मी संध्याकाळी मंदिरात जातो किंवा मित्रांसोबत बागेत जातो.
३) न्यूनत्वबोधक – पण,परंतु,परी
उदा.- त्याने चांगला अभ्यास केला पण गुण कमी मिळाले.
४) परिणामबोधक – म्हणून,सबब उदा- देह जाओ अथवा राहो.
उदा.- मोहन गावी गेला आहे म्हणून तो शाळेत आला नाही.
३) मिश्र वाक्य –
जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.
१) स्वरूप बोधक – की,म्हणून,म्हणजे
उदा.- मला विश्वास आहे, की माझा पहिला क्रमांक येईल.
२) कारणबोधक – कारण,का-की,कारण-की
उदा.- तो आजारी पडला, कारण की तो पावसात भिजला.
३) उद्देशबोधक – म्हणून ,यास्तव
उदा.- पैसे कमावता यावेत म्हणून तो शहरात गेला.
४) संकेतबोधक – जर-तर,म्हणजे,की
उदा.- जर अभ्यास केला तर चांगले गुण मिळतील.